नवी दिल्ली
ऑनलाईन अन्न पुरवठा करणारी कंपनी झोमॅटोचा डिसेंबर 2021 तिमाहीमध्ये निव्वळ तोटा कमी होत 67.2 कोटी रुपयावर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात समान तिमाहीत कंपनीला 352.6 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याची नोंद करण्यात आली होती. तिमाहीच्या दरम्यान कंपनीचे उत्पन्न वधारुन 1,112 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. जे मागील आर्थिक वर्षातील समान कालावधीत 609.4 कोटी रुपये होते.









