ऑनलाईन टीम / मुंबई :
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झटपट झाली. या हल्ल्यात भारताचे 20 जवानांना वीरमरण आले आहे. यावरून देशातील अनेक नेते आक्रमक झाले आहेत.
त्यातच राषट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे ‘लाल आंखे’ करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट द्वारे दिला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे.

झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे ‘लाल आंखे’ करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता? असे म्हटले आहे.









