न्यूयार्क
अमेरिकेतील एका कंपनीचे मूळचे भारतीय सीईओ विशाल गर्ग यांनी झूमवर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये जवळपास 900 पेक्षा अधिक कर्मचाऱयांना अचानकपणे नोकरीवरुन कमी केले आहे. सीईओंनी खराब कार्यक्षमता, खराब प्रदर्शन आणि उत्पादकतेतील उणिवांची कारणे सांगितली आहेत. न्यूज चॅनेल सीएनएनच्या माहितीनुसार झूमवर ऑनलाईन बैठकीत हा अचानक निर्णय सादर केल्याने अनेक कर्मचारी चिडले, भडकले असल्याचेही दिसून आले. असा निर्णय दुसऱयांदा घेत असल्याचेही गर्ग यांनी म्हटले आहे.









