आम्ही कोण म्हणूनी काई पुससी, आम्ही असू लाडके… केशवसुतांच्या ह्या दोन ओळींमध्ये खरंतर एक म्हणणं दडल आहे.. ज्या निर्मात्याने आपल्या सगळय़ांना बनवलय, त्यांनी आम्हाला जरा जास्तच प्रेमाने बनवलय, तुम्ही म्हणत असाल याला जाड वगैरे पण आम्हाला फरक पडत नाही. नाजूक साजूक होऊन गुलाबी स्कूटरवर फिरण्यापेक्षा आम्हाला आमची बुलेट जास्त प्रिय आहे आणि मुळात म्हणजे ती झेपते, चौकात कोणी छेड काढलीच तर त्याच्या 206 हाडांची 412 हाड कशी करायची ते यांना चांगलेच माहित आहे.
क्रिकेटमध्ये थोडा अजून स्कोर हवा होता यार, डीजे पार्टी मध्ये थोडं अजून वाजवा ना दादा, थोड अजून नाचायचय. थोडं जास्त थोडं म्हणत झी मराठीवर असा कार्यक्रम येतोय ज्यामध्ये जास्त तडका, सॉलिड डान्स आणि धमाल मनोरंजन असणार आहे. इतर शो मध्ये आपण शोधतो एक्स पॅक्टर इथे आपण शोधणार आहोत डबल एक्सएल पॅक्टर. 24 सप्टेंबर पासून असाच एक डान्सिंग रिऍलिटी शो येतोय ज्याच नाव आहे डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज. 15 वर्ष आणि त्यावरील अशा मुली आणि महिला यात सहभागी झाल्या आहेत ज्यांचे वजन 70 किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे. नाटय़लेखक – दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या स्पर्धेचे नफत्यदिग्दर्शन ओंकार शिंदे करणार आहे. तर या वजनदार स्पर्धकांचे परीक्षण सोनाली कुलकर्णी आणि आरजे मलिष्का करतील. डान्सिंग क्वीन या रिऍलिटी शो च्या माध्यमातून प्रथमच आरजे मलिष्का परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 सप्टेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता फक्त झी मराठीवर प्रसारित होणार आहे.