झी चित्रमंदिर या झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईजेज लि. च्या नवीन मराठी चित्रपट चॅनेलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि हे चॅनेल लाँचच्या एका आठवडय़ाच्या आतच फ्री डिश व्यासपीठावर पहिल्या क्रमांकाचे चॅनेल म्हणून उदयास आले आहे. मराठी-भाषिक क्षेत्रातील दोन-तृतीयांश बाजारपेठेला व्यापून घेणारे झी चित्रमंदिर महाराष्ट्रातील फ्री डिश व्यासपीठावर 368 मिनिटांचा सर्वोच्च टीएसव्ही आणि 39.1 टक्क्यांच्या विक्रमी सुरूवातीच्या पोहोचसह सर्वाधिक पाहण्यात आलेले चॅनेल ठरले. झी मराठी चॅनेल पोर्टफोलिओमधील नवीन चॅनेल झी चित्रमंदिर नॉन-स्टॉप मसाला हिट्स, लक्षवेधक नाटय़ आणि रोमांचक चित्रपटांपासून हलक्या-फुलक्या कॉमेडीज व भक्तीमय ऑफरिंग्जच्या खास निर्मितीपर्यंतच्या 600 हून अधिक लोकप्रिय चित्रपटांच्या सर्वात मोठय़ा लायब्ररीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील दर्जेदार फ्री डिश ऑफरिंगच्या गरजेची पूर्तता करते.
भारतात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. या मनोरंजनाच्या सवयीची पूर्तता करण्यास मनोरंजनपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली. चॅनेल सादरीकरणावेळी महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेला मराठी चित्रपट ‘सैराट’ दाखवण्यात आला, ज्यानंतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दाखविण्यात आले. दर्जेदार चित्रपट पाहण्याचे मनोरंजन देण्यासोबत झी चित्रमंदिरने तयार केलेल्या भक्तीमय ऑफरिंग्ज दिवसभर व मनोरंजन गरजांची पूर्तता करतात.
या यशस्वी कामगिरीबाबत बोलताना झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईजेज लिमिटेडच्या नॉर्थ, वेस्ट ऍण्ड प्रिमिअम चॅनेल्सचे क्लस्टर प्रमुख अमित शाह म्हणाले,’’आम्हाला महामारीदरम्यान झी चित्रमंदिर चॅनेल लाँच केल्यानंतर देखील या चॅनेलला प्रेक्षकांकडून मिळालेल्या अशा अभूतपूर्व प्रतिसादाचा खूप आनंद झाला आहे. फ्री डिश चॅनेल म्हणून झी चित्रमंदिरने अल्पावधीतच दर्जेदार व सर्वसमावेशक चित्रपट कन्टेन्ट सादर करत महाराष्ट्रातील बहुतांश चित्रपटप्रेमींचे यशस्वीरित्या लक्ष वेधून घेतले आहे.
झी चित्रमंदिरच्या लाँचमुळे महाराष्ट्रातील 80 टक्के चित्रपट पाहण्याची आवड असलेल्या मराठी-भाषिक लोकांच्या मनोरंजनासंदर्भातील पोकळी भरून निघाली आहे.









