मुंबई \ ऑनलाईन टीम
मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचा प्रकार समोर आल्याने, यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले आहे . याचपार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, आता कळले..ठाकरे सरकारमधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाईसारखे येड्या सारखं का बडबड करत असतात..झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार? असे म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
तसेच, “मंत्रालयात दारूच्या बाटल्या! हे माझ्यासाठी अजिबात धक्कादायक नाही. नाईटलाईफ गँगचा मंत्री तिथं राहतो, तर नक्कीच तिथे पार्टी…दारू आणि बरचं काही असणार… आता मंत्रालयात येणाऱ्याची करोना तपासणी करण्या अगोदर, पेंग्विन गँगपासून सुरूवात करत प्रत्येकाची अल्कोहल टेस्ट का केली जाऊ नये?” अशा शब्दात नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.
तर,महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.








