ऑनलाईन टीम / रांची :
झारखंड सरकारने कोणतीही सूट न देता पुन्हा एकदा ‘आरोग्य सुरक्षा सप्ताह’ मध्ये 1 जुलैपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता राज्यात एक जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊन असणार आहे. या काळात आतापर्यंत लागू असलेले सर्व निर्बंध जारी असतील.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्य सचिव सुखदेव सिंह म्हणाले, झारखंडमधील कोरोना रूग्णांची साखळी तोडण्यासाठी राज्यातील हेमंत सरकारने ‘आरोग्य सुरक्षा सप्ताह’ जारी केला आहे. या दरम्यान, कोरोना परिस्थिती पाहून घातलेल्या निर्बंधात सूट देखील दिली गेली. 24 जूनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊनमध्ये जेथे दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत तिथे आता शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण मिनी लॉकडाऊनची व्यवस्था 1 जुलैपर्यंत असणार आहे.
या अंतर्गत सर्व दुकाने आता सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून ते सोमवार सकाळपर्यंत सर्व काही बंद असणार आहे.
काय असणार सुरू आणि बंद
- सर्व जिल्ह्यात दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत.
- सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये 50 % क्षमतेनुसार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू असतील.
- शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व दुकाने (फळे, भाजी, किराणा) बंद राहतील. आरोग्य सेवेसंबधित प्रतिष्ठान आणि दूध डेअरी सुरू असणार आहे.
- अन्य निर्बंध पाहिल्याप्रमाणे असणार आहेत.
- थिएटर, क्लब, बार, कार्यालये, मल्टिप्लेक्स बंद असतील.
- सर्व शिक्षण संस्था बंद असतील. आंगांवडी केंद्रे बंद असतील. मात्र, लाभार्थ्यांना त्याच्या घरी खाद्य सामुग्री पोहचवली जाईल.
- पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. धार्मिक स्थळे अजूनही बंदच असतील.
- विवाह समारंभात केवळ 11 जणांना तर अंतिम संस्कारासाठी 20 सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- काही अपवाद वगळता दुसऱ्या राज्यातून झारखंडमध्ये येणाऱ्यांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक असेल.
- सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- सरकारद्वारे देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.