ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडमध्ये लवकरच दुसरे विमानतळ देवघरमध्ये बनवले जाणार आहे. प्रदेशात सध्या केवळ रांचीमध्ये विमानतळ आहे. देवघर विमानतळ हे एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि राज्य सरकारच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मे 2018 मध्ये व्हिडिओ लिंकद्वारे झारखंडमधील सिंद्री येथील देवघर विमानतळाची पायाभरणी केली होती.
या विमानतळाच्या निर्मितीसाठी 401.34 कोटी रुपये खर्च येणार असून लवकरच या विमानतळाचे काम पूर्ण होईल. हे विमानतळ 653.73 एकर क्षेत्रामध्ये असेल. विमानतळावरील धावपट्टीची लांबी 2500 मीटर असेल आणि एअरबस 320 विमान देखील येथे उतरवण्यासाठी सक्षम असेेल.









