ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडचे पेयजल आणि आरोग्य मंत्री मिथिलेश ठाकूर आणि आमदार मथुरा प्रसाद मेहता यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतः ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. हेमंत सोरेन हे मागील काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात होते.
मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांचे प्रधान सचिव, प्रेस सलाहगार यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी देखील खबरदारी म्हणून स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. मुख्यमंत्री सरकारी निवासस्थानात क्वारंटाइन झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी बाहेरून येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली. दरम्यान, आरोग्यमंत्री मिथिलेश ठाकूर यांना रिम्स रुग्णालयात, तर आमदार मथुरा प्रसाद मेहतो यांना एका कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.