ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडचे पेयजल आणि आरोग्य मंत्री मिथिलेश ठाकूर यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना मंगळवारी रात्री उशिराने राजेंद्र आयुर्विज्ञान संस्था (रिम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
रिम्सचे प्रवक्त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ठाकूर यांना मंगळवारी संध्याकाळी कोरोनाची लागण झाली असून ते सध्या रिम्समध्ये उपचार घेत आहेत. तसेच ठाकूर यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. ठाकूर हे झारखंडमधील मंत्रिपरिषदेत कोरोनाचा संसर्ग झालेले पहिलेच आहेत.
दरम्यान, झारखंडमध्ये मागील 24 तासात 197 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 3056 इतकी झाली आहे. तर 2014 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.









