प्रतिनिधी / सरवडे
नरतवडे ता.राधानगरी येथील दत्तात्रय मारुती कुंभार (वय.४०) या तरुणाचा झाडावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचा युवक माळवाडी नावाच्या शेतात वादळी वाऱ्याने पेचलेली फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला असता पाय घसरुन तो जमिनीवर पडला. उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून मृतदेहाचे सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









