प्रतिनिधी /बेळगाव
नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात तिसऱया श्रावण सोमवारी काशीविश्वेशर (विश्वनाथ) म्हणजे नवव्या ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली होती. दर श्रावणतील तिसऱया सोमवारी 12 ज्योर्तिलिंगे स्थापन करण्याचा संकल्प मंदिराच्यावतीने करण्यात आला आहे. यावषी या संकल्पाचे नववे वर्ष असल्याने नवव्या ज्योर्तिलिंगाची स्थापना करण्याबरोबरच वैष्णोदेवीची स्थापनासुध्दा करण्यात आली होती.
यावेळी सकाळी मंदिरात शिवपिंडीला आणि जोतिबाला लघुरूद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर वैष्णोदेवीची स्थापना करून तिची ओटी भरण्यात आली. यावेळी रात्री देवाला नैवेद्य दाखवून यंदाचा नवव्या ज्योतिर्लिंगाचा संकल्प पूर्ण करण्यात आला. दरवषी तिसऱया श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात ज्योतिर्लिंग स्थापनेबरोबच बर्फाची शिवपिंडीदेखील साकारण्यात येते.
मात्र गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने मंदिरात भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी देखील बर्फाची शिवपिंडी साकारण्यात आली नाही. मात्र पुढील वषी मंदिरात बर्फाची शिवपिंडी साकारून भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे दादा अष्टेकर भक्त मंडळ आणि कुटुंबियांतर्फे कळविण्यात आले आहे.









