प्रतिनिधी / बेळगाव
द.म.शि. मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये जी. एस. एस. कॉलेजचे (असोसिएट, एम. एस्सी. फिजिक्स) प्रा. भरत एम. तोपिनकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाळेचे सेक्रेटरी नितीन घोरपडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे प्रा. तोपिनकट्टी यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी शाळेच्या शिक्षिका निशा भोसले यांनी पाहुण्यांची ओळख करून
दिली. यावेळी बोलताना प्रा. तोपिनकट्टी यांनी शिक्षक ज्यावेळी मार्गदर्शन करतात त्यावेळी लक्षपूर्वक पाहावे, वहीत नोंदवावे, शाळेत आल्यानंतर अधिकाधिक वेळ अभ्यासात घालवावा. एकाग्रतेने व मन लावून अभ्यास करावा, असे अभ्यासाचे तंत्र सांगितले. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन निशा भोसले यांनी केले. आभार स्वाती कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









