वार्ताहर/ कोगनोळी
येथील वीरभद्र कॉलनीतील ज्योतिषविशारद निशांत स्वामी यांना कर्नाटक मुक्त विश्वविद्यालय म्हैसूर यांच्यावतीने ज्योतिषरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन निशांत स्वामी यांना गौरविण्यात आले.
निशांत स्वामी यांनी ज्योतिषशास्त्र अभ्यासात कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांनी ज्योतिषशास्त्रात वैशिष्टपूर्ण अभ्यास केला आहे. याची दखल घेऊन त्यांना ज्योतिषरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे डॉ. मुगोळ यांनी सांगितले. यावेळी कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय बेंगळूरचे उपकुलपती डॉ. प्रकाश पागोजी, म्हैसूरचे डॉ. के. जी. पुट्टव्हन्ना, कर्नाटक ज्योतिषी बोधना संस्था बेंगळूरचे प्रा. गजेंद्र यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.









