ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पीए अनिल मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल मिश्रा हे 2 जुलै रोजी राजभवन येथे झालेल्या शपथ सोहळ्यात देखील सहभागी झाले होते. त्या सोबतच त्यांनी भाजप कार्यालयाच्या व्हर्चुअल रैली मध्ये देखील सहभाग घेतला होता त्यावेळी ते अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते.
अमित मिश्रा हे मुख्यमंत्री हाऊसमध्ये सिंधिया समर्थक माजी आमदारांबरोबर झालेल्या बैठकीच्या वेळी देखील उपस्थित होते. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर पार्टीमध्ये एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधिया यांचे पीए जवळपास एक हजार कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले होते. याआधी भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना दिल्लीतील मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर झालेल्या उपचारानंतर दोघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.









