संगमनेर / ऑनलाईन टीम
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते. त्यातील काही जणांना काल घरी सोडण्यात आले.
सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे.
‘रायगडची राणी’ या वगनाट्यासोबतच ‘गवळ्याची रंभा’, ‘गोविंदा गोपाळा’, ‘1857 चा दरोडा’, ‘तडा गेलेला घडा’, ‘अधुरे माझे स्वप्न राहिले’, ‘कलंकिता मी धन्य झाले’, ‘असे पुढारी आमचे वैरी’, ‘डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘कोंढाण्यावर स्वारी’ आदी वगनाट्यात कांताबाईनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








