ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये दोनतीन आसने राखीव ठेवण्याची जुनी पद्धत आहे. त्यामुळे पूर्वी मला ज्येष्ठबद्दल असूया वाटायची. पण बघता बघता मीच ज्ये÷ झालो. आसनावर हक्काने बसू लागलो. नोकरीत असताना सहकारी म्हणायचे की तुम्ही इतके वयस्कर वाटत नाही, वयाच्या मानाने तरुण दिसता. हे ऐकून तेव्हा हुरळून जायचो. पण निवृत्तीनंतर हे तथाकथित तरुण दिसणे जड जाऊ लागले. डायनिंग हॉलमध्ये ज्येष्ठना पंधरा टक्के सवलत मिळते. ज्ये÷तेचा पुरावा म्हणून मी खिशात आधार कार्डची फोटोप्रत बाळगू लागलो. सांगायला संकोच वाटतो, पण माझा आहार अंमळ जास्त आहे. त्यामुळे डायनिंग हॉलमध्ये मी जेवणावर मारलेला आडवा हात आणि माझं आधार कार्ड यातली संगती हॉटेलचालकांना लागत नसे.
एकदा प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसमध्ये मी माझ्या आसनावर बसलेलो असताना एक अतिज्ये÷ काका आले आणि मला उठवू लागले. “मिस्टर, ही सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.’’
“मी देखील ज्ये÷ आहे.’’ “कशावरून?’’
“ते मी तुम्हाला का सांगू? तुम्ही बस पोलीस चौकीवर घ्यायला सांगा. माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करा. मग मी पोलिसांना योग्य ते उत्तर देईन.’’
“भाषेवरून पक्के पुणेरी दिसता. पण मी देखील पुणेरी आहे.’’
“असाल किंवा नसाल. मी कुठे तुम्हाला पुरावा मागतोय. मी उठणार नाही.’’“म्हाताऱया माणसाला असं बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही?’’“तुम्ही कोण स्वतःला म्हातारा समजणारे? मी देखील म्हातारा आहे. ज्येष्ठ आहे.’’“चेहऱयावरून वाटत नाही. बायकांसारखे त्या संतूर साबणाने आंघोळ करता की काय?’’“मी आंघोळच करत नाही. काय म्हणणं आहे? आणि तुम्ही इतके भांडताय. तुमच्या तोंडातला दम आणि एकूण स्टॅमिना बघून तुम्ही पट्टीचे पिणारे वाटताय. पिणाऱया माणसांचे केस लवकर पांढरे होतात, गळतात, दारूबरोबर सिगारेट-गुटखा वगैरेची सवय असल्याने दात किडून पडतात. मग ते म्हातारे दिसू लागतात. त्यांना देखील आपण ज्ये÷ असल्याचा भ्रम व्हायला लागतो. तुम्ही त्यातलेच.’’
“मला दारूडा म्हणतोस? गेल्या साठ वर्षात मी चहाला, विडीकाडीला, बाटलीला शिवलो नाही. कुठलंही व्यसन केलं नाही. रोज सकाळी मी सूर्यनमस्कार घालून दोन चमचे च्यवनप्राश खातो.’’
“खरोखरच रोज सूर्यनमस्कार घालत असता तर तुम्ही बसमध्ये न चढता धावत धावत बसला ओव्हरटेक केले असते.’’
आमचं भांडण अजून चाललं असतं. पण माझं उतरण्याचं ठिकाण आलं आणि मी उतरलो.