ऑनलाईन टीम / मुंबई :
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही कोरोनाने त्यांना गाठले. सध्या ते स्वतःच्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. ‘घरात राहा आणि सुरक्षित राहा.. मी कोरोना पॉझिटीव्ह आहे,’ अशी इन्स्टास्टोरी त्यांनी शेअर केली आहे.
जोशी सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये आजोबांची भूमिका निभावत आहेत.









