ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आज सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी सायरा बानो यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
दिलीप कुमार यांना मागील महिन्यात याच रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, काही चाचण्या केल्यानंतर त्यांना लगेचच डिस्चार्ज देण्यात आला होता.









