प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात काँग्रेस पक्षाचे काही ज्येष्ठ नेते आहेत. हे नेते पक्षासाठी काही योगदान देत नाही. उलट पक्षासाठी काम करणाऱयांच्या सदर्भात दिल्लीतील नेत्याचे कान भरतात. त्यांनी हे प्रकार बंद करावेत आणि जर ते बंद केले नाही तर आपण त्यांना कान पकडून जाब विचारणार असल्याचा इशारा मिकी पाशेको यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ नेते दिल्लीतील नेत्यांचे कान भरतात. ते स्वताहून पक्षासाठी काहीच योगदान देत नाही. दिल्लीतील नेत्यांचे कान भरल्याने चुकीचा संदेश दिल्लीत जातो. त्याच बरोबर पक्षासाठी काम करण्यात अडथळे निर्माण होतात असे मिकी पाशेको म्हणाले.
तृणमूल जाण्यापेक्षा संन्यास घेऊ
आपल्याला तसेच आपल्या बायकोला उमेदवारी दिली तर आपण तृणमूल काँग्रेस पक्षात जाणार असल्याची मेसेज सद्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे. पण, आपण तृणमूल काँग्रेस मध्ये जाण्यापेक्षा राजकीय सन्यास घेईन. आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षासाठी कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या लुईझिन फालेरोवर त्यांनी टीका केली. लुईझिन फालेरो यांची ओळख ही काँग्रेस पक्षामुळेच होती. तसेच गांधी घरण्यांने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. मात्र, त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करून गांधी घरण्यांचा विश्वासघात केला.
पर्यटन हंगामासाठी उत्तर गोव्यात ‘वॉटर स्पोर्टस्’ सुरू करण्यात आलेले आहेत. काही शेक्स देखील सुरू झालेली आहे. उत्तर गोव्यातील आमदार व मंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मात्र, दक्षिण गोव्यात वॉटर स्पोर्टस् सुरू झालेला नाही. हा दक्षिण गोव्यावर झालेला अन्याय आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे वॉटर स्पोर्टस् व्यवसायात असलेल्यांना जबरदस्त फटका बसला असून स्थानिक आमदारांनी त्यांना आपला धंदा सुरू करण्यास मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. गेली साडेचार वर्षे मुख्यमंत्र्यांचे गुणगान करण्यात आले. मात्र, वॉटर स्पोर्टस् व्यावसायिकांना न्याय देऊ शकलेले नाहीत अशी टीका त्यांनी चर्चिल आलेमाव यांचे नाव न घेता केली.









