काही वर्षांपूर्वी विकिलिक्स प्रकरणामुळे जगभरात प्रसिद्ध पावलेला पत्रकार ज्युलियन ऍसँज आता विवाह बंधनात अडकणार आहे. त्याने जगातील अनेक देशांच्या प्रमुखांच्या तसेच बडे अधिकारी व मंत्र्यांच्या गुप्त बाबी बाहेर काढल्या होत्या. विविध देशांमधील दुतावासांच्या अधिकाऱयांनी त्यांच्या देशांच्या प्रमुखांना पाठविलेले गुप्त संदेश मिळवून त्याने ते उघड केले होते. त्यामुळे जगभरात प्रचंड खळबळ माजली होती. अखेर त्याला गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन कारागृहात डांबण्यात आले. 2019 पासून तो लंडन येथील कारागृहात आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न चालविलेले आहेत.
त्याने आता स्टेला मॉरिसन नामक आपल्या मैत्रीणीशी लग्न करण्याची अनुमती मागतिली असून त्याला ती देण्यात आली आहे. स्टेला मॉरिसनशी त्याची ओळख तो इक्वेडोर या देशात दुतावासामध्ये काम करत होता. तेव्हापासूनची आहे. ऍसँज याचे एक लग्न पूर्वीच झाले असून त्याला दोन मुलेही आहेत. स्टेला मॉरिसन याही घटस्फोटीत असून त्यांनाही दोन मुले आहेत. आता हे दोघे लवकरच विवाहबद्ध होतील. ऍसँज याला एकंदर 175 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी स्थिती आहे. कारण अमेरिकेत त्याच्यावर 18 प्रकरणे दाखल आहेत. त्याचा हा संभाव्य विवाह जगाच्या चर्चेचा बनणार हे निश्चित आहे.









