ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबईत पाकव्याप्त काश्मीर सारखे भासत आहे, असे वक्तव्य कंगना रानौतने केले होते. यानंतर चहुबाजुंनी टीका होत आहे.
यावरून आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील एक ट्विट करत कंगनावर टीका करताना ज्या मुंबईने या कलाकारांना ओळख दिली, प्रसिद्धी दिली तेच कलाकार आज मुंबईबद्दल असं वक्तव्य करत आहे, असे म्हटले आहे.

धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते, असे म्हटले आहे.
दरम्यान, कंगनाने मुंबई बाबत केलेल्या या वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. अनेकांनी तिला मुंबईत न येण्याचा सल्ला देखील दिला आहे. मात्र यावर पुन्हा एक ट्विट करत मी मुंबईत 9 सप्टेंबरला येत आहे. कोणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा अशा आश्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे आता अजूनच वातावरण चिघळले आहे.









