जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांची विधानपरिषदेत माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
जलाशय उभारणी करताना जमिनीचा सर्व्हे केला जातो. ज्या जमिनींमध्ये पाणी साचून राहते, त्या जमिनीचा सर्व्हे करूनच संबंधित जमीन मालकाला नुकसानभरपाई दिली जाते, अशी माहिती जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांनी विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी शेतकऱयांना नुकसानभरपाई योग्यप्रकारे मिळाली नाही, अशी तक्रार केल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
शेतकऱयाची जमीन घेणे म्हणजे त्यांचा जीव घेतल्यासारखाच आहे. कारण शेतीसाठी जीव देण्यासही शेतकरी मागे हटत नाही. मात्र अनेक जलाशयांमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱयांना अजूनही नुकसानभरपाई दिली गेली नाही. बागलकोट तालुक्मयातील बिळगी येथील जमिनींच्या दराबाबत मोठी तफावत आहे. ती दुरुस्त करून संबंधित शेतकऱयांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
बिळगी तालुक्मयातील 14 गावांतील शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई दिली गेली नाही, अशी माहिती विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी दिली. यावेळी जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांनी तफावत झाली आहे हे मलाही माहिती आहे. मात्र उपनोंदणी कार्यालयामध्ये जो दर ठरविला जातो तो दरवषी बदलत राहतो. दरवषी त्यामध्ये वाढ होते. ती वाढ झाली नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱयांना नोटीस देताना ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहते त्या शेतकऱयांनाच नोटिसा दिल्या जातात. कारण पाणी कमी झाल्यानंतर त्या जमिनीमध्ये अनेक शेतकरी पिके घेतात. सर्व अधिकार शेतकऱयालाच असतो. अनेक ठिकाणी जलाशयामध्ये गेलेल्या जमिनींचा दर कमी जास्त होवू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.









