बेळगाव : बसवणगुडी, बेंगळूर येथे कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित ज्युनियर, सबज्युनियर व सिनियर जलतरण स्पर्धेत ज्ञानप्रबोधन मंदिरच्या आयसीएसई शाळेतील सुनिधी हलकारे व समृद्धी हलकारे या दोन जलतरणपटूंनी यश संपादन
केले.
नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत 100 व 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुनिधी हलकारने 2 कांस्य तर समृद्धी हलकारेने 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले. या जलतरणपटूंना शाळेच्या प्राचार्या मंजिरी रानडे, प्रशासक गोविंद वेलिंग व क्रीडा शिक्षक अविनाश पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. या यशाबद्दल दोन्ही जलतरणपटूंचा ज्ञान प्रबोधन मंदिर स्कूलच्यावतीने खास गौरव करण्यात आला.









