ऑनलाईन टीम
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन विजयी झाले आहेत. अमेरिकन जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा संधी नाकारली. त्यामुळे बायडन लवकरच अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
दरम्यान, काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा एका ओळीचं ट्विट करुन केला होता. परंतु, प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. बायडन यांनी 270 ची मॅजिक फिगर पार केला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नसून त्यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत.
बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची वर्णी लागणार आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
Previous Articleकिरकोळ कारणातून तरुणाला भोकसले,अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल
Next Article इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या









