वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी (जोतिबा) येथे भरधाव टेम्पोने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. सरवळ नावाच्या शेताजवळ घडलेल्या या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. सर्जेराव आनंदराव थोरात (रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि. सांगली) व सुनिल महीपती गोडसे (रा.भवानीनगर बिचुद ता वाळवा जि सांगली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत कोडोली पोलिसातून मिळालेली माहिती अशी, की आज दुपारी तीनच्या सुमारास दाणेवाडी ते गिरोली रोडवर वाडी रत्नागिरीच्या ह्द्दीत महिंद्रा मॅक्सीमा टेम्पो चुकीच्या बाजूने भरधाव जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला टेम्पोने जोराची धडक दिली. यामध्ये सुनील गोडसे आणि सर्जेराव थोरात गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या बाबतची दानेवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब यशवंत पाटील यांनी तक्रार दिली. त्यानंतर टेम्पो चालक प्रकाश पांडुरंग कदम (रा. दाणेवाडी, ता पन्हाळा ) यांच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा फौजदार शेडगे हे करीत आहेत .
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांत घट
Next Article मुलांसाठी “ऑनलाईन’’ असणे…..किती घातक?









