प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डू ता.माढा येथील तलाठी अंकुश भगवान मेहेर यांच्या पत्नी छाया अंकुश मेहेर वय ४५ यांचा दिघंची ता.आटपाडी येथे झालेल्या कार अपघातात ठार झाल्या. याबाबत नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकुश भगवान मेहेर हे आपल्या कुटुंबासह ब्रिझा कार गाडी नं एम एच ४५ ए डी ८४४२ ने कोल्हापूर येथे ज्योतिबाचे दर्शनासाठी शनिवार दि.२३ जानेवारी रोजी गेले होते.
रविवार दि.२४ रोजी परतत असताना दिघंचीजवळ कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दुभाजकाला धडकून छाया अंकुश मेहेर यांचा मृत्यू झाला. यामध्ये अंकुश भगवान मेहेर वय ५० आरती अंकुश मेहेर वय १९,अविनाश अंकुश मेहेर वय १७ हे जखमी झाले आहेत.









