वारणानगर / प्रतिनिधी
वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्रीजोतिबा डोंगर येथे देवदर्शनासाठी आलेल्या इस्लामपूर येथील महिलेला चोरट्यांनी मोठा गंडा घातला. पर्स मधील सोळा तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रोख रक्कम असे आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे.
हेमलता अधिकराव पाटील रा. आर.आय.टी. कॉलनी इस्लामपूर ह्या आपल्या कुटुंबासमवेत श्रीजोतिबा दर्शनासाठी रविवार दि.२९ रोजी आल्या होत्या. रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची जोतिबा डोंगरावरती मोठी गर्दी झाली होती. याचा नेमका फायदा घेत हेमलता पाटील या काळभैरव देवाचे दर्शन घेत असताना त्यांनी आपल्या गळ्यामध्ये अडकवलेल्या पर्स मधील लहान पर्स मध्ये ठेवलेले चार तोळ्याच्या पाटल्या, लक्ष्मी हार,नेकलेस, नतनी, ब्रेसलेट, मनगटी मनी व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ८ लाख चा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला.
हेमलता पाटील ह्या आपल्या रेठरे खुर्द ता.कराड माहेरी गावी राहण्यास जाणार असल्याने घरातील सर्व १६ तोळे दागिने त्यांनी पर्स मध्ये ठेवले होते. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









