सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियवर सध्या एक प्री वेडिंग फोटोशूट व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये जोडपे हातात बेडय़ा घालून असल्याचे दिसून येते. या जोडप्याने उसाच्या मळय़ात परस्परांसोबतची छायाचित्रे काढून घेतली आहेत. आमचे प्रेम पूर्वीप्रमाणे अधिक दृढ झाले आहे. हा पुरुष गुलाम नव्हे तर आमच्या कुटुंबाचा हिस्सा असल्याचे इन्स्टाग्रामवरील पोस्टसोबत नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या पोस्टचे अनेक स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले आहेत. अनेक युजर्सनी या फोटोशूटवर टीका केली आहे.
सोशल मीडियावर या प्री वेडिंग फोटोशूटला प्रसारित करणाऱया व्यक्तीने लवकरच याचा दुसरा भागही पोस्ट करणार असल्याचे सांगितले आहे. अशाप्रकारचे अनेक फोटो अद्याप शेअर करायचे शिल्लक असल्याचे त्याने नमूद केले आहे. ही एक चांगली कल्पना असून हे फोटो खरे आहेत यावर विश्वास ठेवणे अवघड असल्याचे काही युजर्सनी म्हटले आहे.









