वृत्तसंस्था/ पॅरीस
सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने एटपी क्रमवारीतील आपले अग्रस्थान 334 आठवडे राखण्याचा पराक्रम केला आहे. सोमवारी एटीपीची ताजी मानांकन क्रमवारी यादी जाहीर करण्यात आली.
सर्बियाच्या जोकोविचने एटीपीच्या मानांकन यादीत 334 आठवडे अग्रस्थान राखण्याचा पराक्रम केला असून त्याने स्वीसच्या रॉजर फेडररचा 310 आठवडय़ांचा विक्रम मागे टाकला आहे. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत जोकोविच पहिल्या स्थानावर असून स्वीसचा फेडरर नवव्या स्थानावर आहे.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच 12113 गुणांसह पहिल्या, रशियाचा मेदवेदेव्ह 10620 गुणांसह दुसऱया, ग्रीकचा सित्सिपस 8350 गुणांसह तिसऱया, स्पेनचा नदाल 7815 गुणांसह चौथ्या, जर्मनीचा व्हेरेव्ह 7263 गुणांसह पाचव्या, ऑस्ट्रीयाचा थिएम 7005 गुणांसह सहाव्या, रशियाचा रूबलेव्ह 6005 गुणांसह सातव्या, इटलीचा बेरेटेनी 5533 गुणांसह आठव्या, स्वीसचा रॉजर फेडरर 4215 गुणांसह नवव्या आणि कॅनडाचा शेपोव्हॅलोव्ह 3625 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.









