वृत्तसंस्था / टय़ुरीन (इटली)
2021 टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील पुरुषांच्या अंतिम आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेला येथे प्रारंभ होणार आहे. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा घेतली जात असून केवळ आठ सिडेड खेळाडूंना प्रवेश दिला जातो. आता ही स्पर्धा येथे 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाणार आहे. प्रत्येक खेळाडू दुसऱया खेळाडूबरोबर एक सामना खेळणार आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ गुरुवारी काढण्यात आला. सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविचचा सलामीचा सामना हॉलंडच्या रुडविरुद्ध होणार आहे. ग्रीन गटामध्ये जोकोविच, ग्रीसचा सिटसिपेस, रशियाचा रुबलेव्ह, हॉलंडचा कास्पर रुड त्याचप्रमाणे रेड गटात रशियाचा मेदव्हेदेव, जर्मनीचा व्हेरेव, इटलीचा बेरेटेनी आणि पोलंडचा हुरकेझ यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा एकेरी आणि दुहेरी खेळविली जाणार आहे.









