कुटुंबाला मिळणार 196 कोटी रु. मिळणार – मिनेपोलिस कौन्सिलची मंजुरी
वृत्तसंस्था/ मिनेपोलिस
अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूच्या प्रकरणात तडजोड झाली आहे. तडजोडवजा करार मिनेपोलिसचे सिटी कौन्सिल आणि फ्लॉयडच्या कुटुंबादरम्यान झाला आहे. तडजोड 2.7 कोटी डॉलर्समध्ये (सुमारे 196 कोटी रुपये) झाली आहे. पण माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन याच्यावरील खटला सुरूच राहणार आहे.
तडजोड संदर्भात कौन्सिल सदस्यांनी वैयक्तिक स्वरुपात भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बैठकीत सामील होत सर्वसंमतीने एवढय़ा मोठय़ा रकमेच्या समर्थनार्थ मतदान केले आहे. नागरी अधिकारांच्या दाव्यांसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा तडजोडर करार असल्याचे उद्गार फ्लॉयड कुटुंबाच वकील बने क्रम्प यांनी काढले आहेत.
ही तडजोड मागील वर्षी जुलैमध्ये फ्लॉयड यांच्या कुटुंबाकडून मिनेपोलिस प्रशासनाच्या विरोधात संघीय नागरी अधिकारांच्या उल्लंघनारवून दाखल याचिकेच्या पार्श्वभूमीवर झाली आहे.
चौविन प्रकरणी सुनावणी
फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणी चौविन विरोधातील सुनावणीसाठी ज्युरीमध्ये 6 जणांची निवड करण्यात आली आहे. चौविनसंबंधी माझ्या मनात अत्यंत नकारात्मक प्रतिमा असल्याचे म्हणणारा व्यक्तीही यात सामील आहे. न्यायाधीशांनी याप्रकरणी चौविनच्या विरोधात थर्ड डिग्री हत्येचे आरोप निश्चित केले आहेत.
25 मे रोजी फ्लॉयडचा मृत्यू
मिनेपोलिसमध्ये मागील वर्षी 25 मे रोजी फ्लॉयडला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. यापूर्वी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांनी फ्लॉयडला रस्त्यावर दाबून ठेवले होते. तसेच स्वतःच्या गुडघ्याने त्याच्या मानेला सुमारे 8 मिनिटांपर्यंत दाबले होते. यातून त्याचा मृत्यू ओढवला होता.









