बेळगाव : / प्रतिनिधी
पांगुळ गल्ली येथील समस्त जैन समाजाने ढोरवाडा येथील गोरगरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे गोरगरिबांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. आशा गरजूंना तेल पाकीट, गहू, चहापावडर, साखर, मीठ, मिरची, हळद अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अनिल बेनके, किरण जाधव, संजय पोरवाल, विकास मेहता, विक्रम पोरवाल, नितेश जैन, अरविंद पोरवाल, किरण पोरवाल आदी उपस्थित होते.









