राजापूर / वार्ताहर
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात कंपाउंडच्या आतमध्ये वणवा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक बंब मागविण्यात आला असून नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वणवा भडकला. आगीचा वणवा एवढा मोठा होता की २ तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली आहे. आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाऊस पडल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली. त्यानंतर फवारणीच्या पंपाने देखील पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Previous Articleमहाराष्ट्र केसरीचा आखाडा यंदा रंगणार; शासनाचा हिरवा कंदील
Next Article आयकर पात्र, सरकारी नोकरदारांना नोटिसा









