नवी दिल्ली
सिमेंट क्षेत्रातील कंपनी जे के सिमेंटने सप्टेंबर 2020 ला संपलेल्या दुसऱया तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ नोंदवली आहे. कंपनीने सप्टेंबरअखेर 221.55 कोटी रुपयांचा नफा कमावला असून वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर कालावधीत तो 79.50 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा महसूल 24 टक्क्यांनी वाढून 1 हजार 634.39 कोटी रुपयांवर पोहचला आहे. जो मागच्या वर्षी समान कालावधीत 1 हजार 317.63 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा खर्च मात्र 11 टक्के वाढून 1 हजार 338.93 कोटी रुपयांवर पोहचला आहे.









