प्रतिनिधी/ बेंगळूर
जेनेरिक औषध विक्री केंद्रांमध्ये ब्रॅन्डेड औषधे विक्रीसाठी परवानगी दिली जाणार नाही. मात्र, आगामी काळात कमी किमतीत आयुर्वेदिक औषधे पुरवठा करण्यात येतील, अशी माहिती केंद्राrय रासायनिक आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी दिली.
हुबळी येथील प्रधानमंत्री जनौषधी केंदाच्या प्रांतीय कार्यालयाचे बेंगळूर येथून व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गरिबांना स्वस्त किमतीत औषधे पुरविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. जेनेरिक औषध दुकानांमधून 10 टक्के ते 90 टक्क्यापर्यंत सवलतीच्या दराने औषधांची विक्री केली जात आहे. जेनेरिक मेडिसिन ऍप उपलब्ध असून त्याच्यामुळे तुमच्याजवळ असणाऱया जेनेरिक औषध दुकानाची माहिती मिळेल. औषधाचे नाव समाविष्ट केल्यास त्या फॉर्म्युलाची इतर कंपन्यांच्या औषधांची यादी दाखवेल. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी लवकरच 1 हजार जेनेरिक औषधविक्री केंद्रे सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
रक्तदाब, मधूमेह असणाऱयांना ब्रॅन्डेड औषधांसाठी 2 हजार ते अडीच हजार रुपये खर्च करावे लागतात. मात्र, याच औषधांसाठी जनेरिक औषध केंद्रांमध्ये केवळ 400 ते 500 रुपये खर्च होतात. आता सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधेच लिहून दिले जात आहे. सरकारी इस्पितळांमध्ये जनेरिक औषधे लिहून दिल्यास त्याचा प्रचार होईल, असेही ते म्हणाले.









