प्रतिनिधी /बेळगाव
जेड गल्ली, शहापूर येथील हायमास्ट सध्या धोकादायक स्थितीत आहे. नागरिकांनी तक्रार देऊनही पथदीप विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा जीव धोक्मयात सापडला आहे. हायमास्टचा एक भाग तुटून लोंबकळत असून तो केव्हा कोसळेल, याची शाश्वती नसल्याने अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील पथदीपांची अवस्था दयनीय झाली आहे. ना अधिकाऱयांचा धाक, ना लोकप्रतिनिधींचा वचक यामुळे कर्मचारी आपला मनमानी कारभार करत आहेत. पथदीप विभागाकडे तक्रार करूनदेखील त्याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने हैराण झालेले नागरिक संतप्त सवाल करीत आहेत. जेड गल्ली येथे मागील काही दिवसांपासून हायमास्टचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. इतक्मया उंचावरून तो कोसळल्यास येथून येणाऱया-जाणाऱया नागरिकांसाठी तो जीवघेणा ठरणार असल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









