नवी दिल्ली
बंद असणाऱया जेट एअरवेजच्या कर्जदारांची समिती (सीओसी) यांची बैठक 12 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून दिली आहे. कायद्यानुसार लिलाव करण्यासाठी लावण्यात येणाऱया बोलीची तारीख कालच्या मंगळवारी समाप्त झाली आहे. त्यामुळे कर्ज देणाऱया संस्थांसाठी ही समिती बोलावण्यात आली आहे. तसेच सध्या कोणती बोली आली आहे, याचा तपशिल मात्र देण्यात आलेला नाही. मागील महिन्यात जेट एअरवेजसाठी बोली लावण्यासाठी अंतिम तारीख 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. आर्थिक संकटाचा सामना करणाऱया या एअरलाईनची उलाढाल एप्रिल 2019 पासून बंद आहे. या कंपनीवर एकूण 8,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आहे.









