वृत्तसंस्था/ कोईमतूर
मोटार रेसिंग क्षेत्रातील शौकिनांना परिचीत असलेल्या 23 व्या जे.के. टायर राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेला शुक्रवारी येथे प्रारंभ होत आहे. ही रेसिंग स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणून ओळखली जाते.
देशातील कोरोना महामारी परिस्थितीचा आढावा घेत स्पर्धा आयोजकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी सक्तीची केली. सदर स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्हाला खडतर परिश्रम घ्यावे लागतील, असे जे.के. मोटो स्पोर्टसचे संजय शर्मा यांनी सांगितले.









