मुंबई
टायर क्षेत्रातील कंपनी जेके टायर्सचा समभाग शुक्रवारी तेजीत असताना दिसला. सदरचा कंपनीचा समभाग शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 10 टक्के इतका वधारत इंट्रा डे दरम्यान 228 रुपयांवर पोहचला आहे. सदरचा समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचला आहे. कंपनीने मध्यप्रदेशातील कारखान्यातील टायर्सचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा सकारात्मक परिणाम समभागावर दिसला आहे.









