वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील कंपनी जिंदाल स्टील ऍण्ड पॉवर लिमिटेडकडून मंगळवारी जुलै ते सप्टेंबर 2020 तिमाहीत एकत्रित पोलाद उत्पादन एक वर्षाच्या तुलनेत जवळपास 18 टक्क्यांनी वाढून 23.50 लाख टनावर पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱया तिमाहीमध्ये पोलादाची विक्री 30 टक्क्मयांनी वधारुन 24.10 लाख टनावर पोहोचली आहे. यातून एक वर्षाच्या अगोदर जुलै ते सप्टेंबरच्या काळात कंपनीचे उत्पादन 19.90 लाख टनावर पोहोचले आहे. या आकडेवारीसोबत विक्रीचा आकडा हा 18.50 लाख टन राहिल्याची नोंद केली आहे.
एप्रिल ते जून सदर तिमाहीत 20.70 लाख टन विक्रीच्या तुलनेत जुलै सप्टेंबर 2020मधील तिमाहीत विक्री 24.10 लाख टन राहिली असून याच दरम्यान पोलाद निर्यात 7.40 लाख टन झाली आहे.









