मुंबई
भारतातील पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलने आपल्या पोलाद उत्पादनात सद्यस्थितीत घट करण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. सध्याला देशात ऑक्सीजनची गरज लागत असून याच्या उत्पादनावर कंपनी भर देत असल्याचे सांगितले जाते. बळळारीतील पोलाद उत्पादन कारखान्यातून कंपनी वर्षाला जवळपास 12 दशलक्ष टन इतक्या पोलादाची निर्मिती करते. सध्याला इस्पितळांसाठी लागणाऱया लिक्वीफाइड मेडिकल ऑक्सीजनची (एलएमओ) निर्मिती करण्याकडे कंपनीचे लक्ष आहे. सध्याला दिवसाला 800 टन इतक्या एलएमओची निर्मिती केली जात आहे.









