नवी दिल्ली
खासगी पोलाद निर्मिती कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलचे जून 2021 च्या समाप्त झालेल्या तिमाहीदरम्यान कच्च्या पोलादाचे उत्पादन 39 टक्क्यांनी वाढून 41 लाख कोटी टनावर पोहोचले आहे. जेएसडब्ल्यू स्टीलने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीचे उत्पादन 29.6 लाख टनावर राहिले होते. जून 2021 मध्ये उत्पादन 13.7 लाख टनावर राहिले असून जून 2020 च्या तुलनेत 18 टक्क्यांनी उत्पादन अधिक राहिले असल्याची नेंद करण्यात आली आहे. देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये 65,000 टनापेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.









