नवी दिल्ली
जेएसडब्ल्यू स्टीलचे ऑगस्ट 2020 मध्ये पोलाद उत्पादन पाच टक्क्यांनी वाढून 13.17 लाख टनावर पोहोचल्याची नोंद केली आहे. एक वर्षाच्या अगोदर याच महिन्यात कंपनीने 12.53 लाख टन पोलाद उत्पादन केल्याची नोंद केली होती. कंपनीने यामध्ये म्हटले आहे की, महिन्याच्या आधारे जेएसडब्ल्यूचे उत्पादन एक महिना अगोदर जुलैच्या 12.46 लाख टन उत्पादनाच्या तुलनेत ऑगस्टमध्ये उत्पादनात सहा टक्क्मयांची वाढ होत 13.17 लाख टनाच्या घरात पोहोचल्याची माहिती आहे. ऑगस्ट 2020 च्या दरम्यान पोलादी पत्र्याचे उत्पादन मागील वर्षाच्या ऑगस्टच्या बरोबरीत 15 टक्क्यांनी वधारुन 9.80 लाख टन झाले आहे.









