कोलकाता
खासगी क्षेत्रातील पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड वर्ष 2024-25 पर्यंत आपली उत्पादन क्षमता वाढवून 3.75 कोटी टन प्रति वर्ष करणार आहे. याकरीता जवळपास 25,115 कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक करण्याची योजना आखणार आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1.50 कोटी टन पोलादाची विक्री केली आहे. कंपनीने उत्पादन क्षमता 2.80 कोटी टनापर्यंत नेण्यासाठी मागील तीन वर्षामध्ये 48 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा दावा केला आहे. या नवीन योजनेमधून आगामी काळात कंपनीची वाटचाल भक्कम राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.









