कराड :
जेएनयूआयच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सोमवारी सायंकाळी कराडला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करीत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जेएनयूआयच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी काँग्रेसच्या वतीने येथील दत्त चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, नगरसेवक राजेंद्र माने, झाकीर पठाण, राजेंद्र यादव, अमित जाधव, साबीरमियाँ मुल्ला, प्रशांत यादव, इरफान मुजावर, समीर पटवेकर, अभिजीत चव्हाण, सूरज जगताप, काँग्रेस, युवक काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘जेएनयू तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.









