ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हल्ल्याप्रकरणी विद्यापीठ संघटना अध्यक्षा आईशी घोषसह इतर 19 जणांविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. 4 जानेवारी रोजी विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात आईशी घोष जखमी झाल्या आहेत.
विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱयांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, 5 जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह 19 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.









