ऑनलाईन टीम
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. अज्ञात मास्कधाऱ्यांनी वसतिगृहात घुसून केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिला देखील मारहाण झाली आहे.
जेएनयूएसयूने या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)चा हात असल्याचे म्हटले आहे. डाव्या संघटनांचे कार्यकर्ते व जेएनयूचे शिक्षक विद्यापीठातील शुल्क वाढीच्या मुद्यावरून आंदोलन करत असताना, ही हाणामारीची घटना घडली.