ऑनलाईन टीम / पाटणा :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला अटक करण्यात आली आहे. बिहारमधील जहानाबाद या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली आहे.
दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. त्याआधी पोलिसांनी सोमवारी रात्री शरजील इमामचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.
नागरिकत्व कायद्याविरुद्ध शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून त्यानं ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शरजीलच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्जीलविरुद्ध 6 राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.









