वारणानगर / प्रतिनिधी
जेऊर ता.पन्हाळा येथील एकजण नावली येथील डोंगरात मृतावस्थेत सापडला . दत्तात्रय मारुती साठे (वय ५०) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून या बाबतची फिर्याद भाऊ रघुनाथ मारुती साठे याने दिली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दत्तात्रय याला दारूचे व्यसन असून तो शनिवार दि.३१ रोजी सकाळी ७.३० वाजता दारूच्या नशेत घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्याचा मित्र परिवार व पै पाहुणे यांचेकडे शोधाशोध केली असता तो मिळाला नाही, रविवार दि.१ रोजी नावली ता.पन्हाळा येथील कुंभार घोल नावाच्या डोंगरात त्याचा मृतदेह सापडला. पुढील तपास पोलीस हावलदार चिले करत आहेत.









